तयारीची सुरुवात थोडी सोपी व्हावी म्हणून… MyPrepDesk.
नमस्कार! मी अमृता. तुमच्यापैकी अनेकांप्रमाणे मीही MPSC ची तयारी करतेय.
अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा नेमकं कुठून सुरू करायचं, हेच कळत नव्हतं. कोणत्या विषयांवर वारंवार प्रश्न येतात? वर्षानुवर्षे प्रश्नांचं स्वरूप कसं बदललंय? आणि आधी कशावर भर द्यायला हवा? असे बरेच प्रश्न होते.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की दिशा मिळेल, हे माहीत होतं. पण papers शोधणं, प्रश्न विषयानुसार लावणं आणि त्यातून exam pattern समजून घेणं यात अपेक्षेपेक्षा जास्त वेळ जात होता. अभ्यास करायचा होता, पण त्याआधी हे सगळं एकत्र करावं लागत होतं.
आणि मग एक प्रश्न आला, “हे तूच का नाही बनवत?”
मी आणि माझ्या नवऱ्याने उपलब्ध apps आणि websites शोधून पाहिल्या. MPSC वर भर असलेलं, जुने प्रश्न, त्यांचं analysis आणि practice एकाच ठिकाणी करता येईल, असं काहीतरी हवं होतं. काही पर्याय पाहिले, पण माझ्या गरजेला जुळणारं काही मिळालं नाही.
तेव्हाच नवऱ्याने सुचवलं, आपणच असं काहीतरी तयार केलं तर? माझ्या तयारीला उपयोग होईलच, आणि कदाचित माझ्यासारख्या इतरांनाही मदत होईल.
पुढचं वर्षभर स्वतःच्या अभ्यासासोबत या कल्पनेवर काम करत गेले. त्यातून हळूहळू MyPrepDesk तयार झालं.
कुठून सुरुवात करायची हे शोधण्यात कमी वेळ, अभ्यासासाठी जास्त वेळ.
सुरुवातीला प्रश्नपत्रिका गोळा करण्यात आणि exam pattern समजून घेण्यात तीन ते सहा महिने जाऊ शकतात. हा वेळ वाचवण्यासाठी मदत व्हावी, हा माझा प्रयत्न आहे. प्रत्येकाची तयारी वेगळी असते, पण हे सगळं एकत्र मिळालं तर पहिली काही पावलं नक्कीच सोपी होऊ शकतात.
MyPrepDesk चा मुख्य भर MPSC वर आहे. उपलब्ध मागील वर्षांचे प्रश्न, topic trends, practice, revision आणि आपल्या प्रगतीचा आढावा, हे सगळं एकाच ठिकाणी मिळावं यासाठी ते बनवलंय. फोन असो किंवा computer, जिथे अभ्यास करत असाल तिथून वापरता येईल.
मीही अजून तयारी करतेय. अभ्यासात येणाऱ्या अडचणींमधूनच MyPrepDesk आणखी कसं उपयोगी करता येईल, हे समजत जातंय. सुरुवातीला मला ज्या मदतीची गरज होती, ती तुम्हाला मिळावी, थोडा गोंधळ कमी व्हावा आणि अभ्यासाला दिशा मिळावी, एवढीच इच्छा आहे.
